AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Aug 19, 06:30 PM
पशुपालनhpagrisnet.gov.in
जनावरांमधील फऱ्या (ब्लॅक क्वार्टर, ब्लॅकलेग) रोगाचे नियंत्रण
गाय आणि म्हैस या जनावरांमध्ये जिवाणूंमुळे फऱ्या (ब्लॅक क्वार्टर) हा रोग पसरतो. या रोगामुळे जनावरांच्या मागच्या पायाच्या वरच्या भागावर तीव्र सूज दिसून येते. ज्यामुळे जनावरे ही लंगडे चालण्यास सुरूवात करतात. जनावरांना तीव्र ताप येतो आणि जेव्हा सूजलेला भाग दाबला जातो तेव्हा चर चर असा आवाज येतो. उपचार आणि प्रतिबंधः बाधित जनावरांच्या उपचारासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी त्वरित संपर्क साधा. गुरांच्या योग्य उपचारात होणारी विलंब शरीरात पसरलेल्या विषाणूमुळे संक्रमण होऊन त्यांच्या मृत्यूला ही कारणीभूत ठरू शकते. पेनिसिलिन लस गुरांच्या उपचारासाठी जास्त प्रमाणात सुजलेल्या भागावर दिली जाते. म्हणूनच, हा रोग रोखण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये लस विनामूल्य दिली जाते; पशुपालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. संदर्भ: hpagrisnet.gov.in
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
247
0