फळ प्रक्रियाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
केळीचे प्रक्रियायुक्त पदार्थ (वेफर्स) तयार करणे
भारतात एकूण उत्पादित केळीचा ९० टक्क्यांपेक्षा अधिक वापर ताजे फळ म्हणून केला जातो. एकूण केळी उत्पादनाच्या केवळ ४ ते ५ टक्के केळीवर प्रक्रिया केली जाते. केळी हे एक खूप नाशवंत फळ असून पिकल्यानंतर फक्त ५ ते ६ दिवसांपर्यंत केळी चांगली राहते. त्यामुळे आपल्याकडील अतिरिक्त केळी उत्पादनापासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करायला आपणास खूप मोठा वाव आहे. बहुतेक केळी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी खूप खर्चिक मशीनरी आणि अधिक गुंतवणूकीची गरज नसते. बरचसे केळी प्रक्रिया उद्योग लघुउद्योग म्हणून सुरू करता येतात. १) पूर्ण वाढ झालेली कच्ची केळी निवडून ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. २) स्टेनलेस स्टील चाकूने फळाची साल काढून मशीनच्या साहाय्याने किंवा चाकूने ०.३ ते ०.५ सें.मी जाडीच्या चकत्या कराव्यात. ३) नंतर या चकत्या ०.१% सायट्रिक अॅसिडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून घ्यावेत. यामुळे चकत्या काळ्या न पडता पांढऱ्या शुभ्र राहतात. ४) नंतर चकत्या उकळत्या पाण्यात ४ ते ५ मिनिट बुडवून, थंड करून प्रति किलो चकत्यास ४ ग्रॅम याप्रमाणे गंधकाची धुरी द्यावी. ५) तयार चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये सुकवाव्या. ड्रायरचे तापमान ५० ते ५५ से. एवढे ठेवावे. ६) चकत्या हाताने दाबल्या असता मोडल्यास त्या पूर्ण तयार झाल्या आहेत असे समजावे. ७) तयार झालेले वेफर्स बटाटा वेफर्सप्रमाणे तळून खाण्यास वापरता येतात. • संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
94
0
संबंधित लेख