फळ प्रक्रियामीडिया स्पेस
द्राक्षापासून बेदाणा (मनुके) तयार करणे
चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार करावयाचा असेल, तर बेदाणे तयार करतेवेळी एकसारख्या आकाराचे, रंगाचे घड बागेतून तोडावेत. घड काढण्यापूर्वी मण्यामध्ये साखरेची गोडी उतरली आहे याची खात्री करून घ्यावी, कारण चांगल्या प्रतीचा बेदाणा म्हटल्यास त्यात गोडी जास्त असावी लागते. काढलेली द्राक्षे शक्‍यतो सुरवातीला स्वच्छ पाण्यातून काढून घ्यावी. त्यानंतर ही द्राक्षे पोटॅशिअम कार्बोनेट @२५ ग्रॅम + ईथाइल ओलिएट @१५ मि.लि (डीपिंग ऑइल) प्रति लिटरच्या द्रावणात दोन ते चार मिनिटे बुडवून ठेवावीत. या द्रावणाचा सामू ११ पर्यंत असावा. त्यानंतर द्रावणातून काढलेली द्राक्षे सावलीमध्ये जाळीवर सुकवावीत.वातावरणातील तापमानानुसार १५ ते २२ दिवसांत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होऊ शकतो. हवा खेळती असल्यास कमी वेळेत चांगल्या प्रतीचा बेदाणा तयार होतो. संदर्भ:- मीडिया स्पेस
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
138
0
संबंधित लेख