जैविक शेतीअॅग्रोवन
अधिक उत्पादनासाठी जीवामृत तयार करा
जीवामृत हे किण्वन प्रक्रिया तयार करून, पिकांना मुलद्रव्य उपलब्ध करून देते तसेच पिकांचे बुरशी किडीपासून संरक्षण करत असते. जीवामृत तयार करण्याची पद्धत – १. बॅरलमध्ये २०० लिटर पाणी घेवून त्यामध्ये १० किलो गाईचे शेण मिसळून घ्यावे. यानंतर ५-६ लिटर गाईचे गोमुत्र, २ किलो गुळ, २ किलो डाळींचे पीठ व शेतीच्या बांधावरील मूठभर माती बॅरलमध्ये एकत्रित व्यवस्थित मिसळून घ्यावे. २. हे तयार केलेलं द्रावण सावलीत ठेवावे. कमीत कमी २ ते ३ दिवस सावलीत ठेवून सकाळ संध्याकाळ काठीने ढवळून घ्यावे. २०० लिटर जीवामृत हे एक एकर साठी पुरेसे होते.
जीवामृताचे फायदे – १. जीवामृत पिकांच्या वाढीचा जोम वाढवते व उत्पादनात वाढ करते. २. पिकांमध्ये सहनशीलता वाढवते तसेच किडींना व रोगाला पिकांपासून दूर करते. ३. मातीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढवते व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविते. ४. जीवामृताचा वापर सिंचनच्या माध्यमातून महिन्यातून २ वेळा करा. संदर्भ-http://www.fao.org जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
705
3
संबंधित लेख