AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Jun 19, 07:00 PM
मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
या आठवडयात पावसाची शक्यता
राज्यात मान्सूनला अनुकूल हवेचे दाब असल्याने २३ जूनला चांगल्या पावसाची शक्यता आहे. २४ जूनला राज्याच्या पूर्व भागावर १००० हेप्टापास्कल, मध्यावर १००२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहिल्यामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व उत्तरेकडील भागात चांगल्या पावसाचा अंदाज असून काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. २५ ते २९ जून या कालावधीत चांगला पाऊस होईल. २३ जूनला कोकणात अतिवृष्टीची शक्यता असून, २४ जूनला मुंबई, ठाणे, रायगड, पालघर भागात अतिवृष्टीची शक्यता राहील. २३ व २४ जूनला मध्य महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टीची शक्यता राहील. मराठवाडा व पश्चिम भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
कृषी सल्ला: १. पावसानंतर ज्या जमिनीत ६५ मिमीपेक्षा अधिक ओलावा असेल, तिथे प्रथम कडधान्य पिकांची व मध्य जमिनीवर बाजरी, तूर या आंतर पीक पध्दती अवलंबावी. २. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत. ३. पाण्याची सोय असल्यास पावसात उघडीप होताच एक संरक्षित पाणी दयावे. ४. कमी कालावधीतील पिकांची निवड व कमी पाणी लागणाऱ्या पिकांची निवड करावी. संदर्भ – जेष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
102
0