कृषी वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
साखर विक्रीसाठी दुहेरी पध्दतीचा वापर होण्याची शक्यता
साखरेच्या दरात होणाऱ्या सततच्या चढ-उताराचा आर्थिक फटका घरगुती ग्राहकांना बसत असल्याने साखऱेच्या विक्री दरासाठी दुहेरी पध्दत सुरू करण्याची योजना राबविण्यात येणार आहे. केंद्रीय कृषी मुल्य आयोगाच्यावतीने याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे.
इंडियन शुगर मिल्स संघटनेनेही या योजनेचे स्वागत केले आहे. साखरेची विक्री ही घरगुती ग्राहकांपेक्षा औदयोगिक क्षेत्रात मोठया प्रमाणात होत असते. साधारणत: ३१ रू. प्रति किलो असा साखरेचा दर असेल तर तो सर्वसामान्य ग्राहकाला व औदयोगिक क्षेत्रालाही सारखाच असतो. त्यामुळे साखर कारखान्यांना त्याचा काही फायदा मिळत नाही, पण साखरेच्या विक्रीसाठी दुहेरी पध्दत सुरू केली, तर साखर कारखान्यांना आर्थिक आधार मिळेल. आज ६० टक्के विक्री ही औदयोगिक क्षेत्रात होत असते. दरवर्षी साधारणत: २६ मिलियन मेट्रिक टन साखरेची मागणी या क्षेत्राकडून येत असते. इतक्या मोठया प्रमाणावर ग्राहक असणाऱ्या या क्षेत्रासाठी जर वेगळा दर ठेवला तर नक्कीच कारखान्यांना फायदा होईल, परिणामी ऊसाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांना ही जास्त पैसे मिळू शकतील, असे आयोगाने म्हटले आहे. केंद्र सरकार याबाबत विचार करत आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांना कमी दरात साखर उपलब्ध होईल त्याचबरोबर साखरेचे भाव नियंत्रणात राहतील. संदर्भ – प्रभात, २५ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
296
0
संबंधित लेख