सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब बहारातील अन्नद्रव्य व्यवस्थापन
सध्या वाढीच्या काळात असलेल्या हस्त बहाराच्या बागेतील मातीचे परीक्षण करून रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. डाळिंब झाडाच्या वयानुसार रासायनिक खतांचा वापर आपल्या बागेत करावा. डाळिंबाचा बहर धरताना प्रति झाड २० किलो शेणखत, २ किलो निंबोळी पेंड, १ किलो गांडूळखत, २५ ग्रॅम ट्रायकोडर्मा प्लस (यात सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्माबरोबरच पॅसिलोमायसीसचे मिश्रण असते. मात्र, केवळ ट्रायकोडर्मा उपलब्ध असल्यास त्यासोबत वेगळे पॅसिलोमायसिस २० ग्रॅम प्रमाणात द्यावे.) १५ ग्रॅम पीएसबी आणि १५ ग्रॅम अॅझेटोबॅक्टर द्यावे. डाळिंबाच्या पूर्ण वाढ झालेल्या झाडांना ३२५:२५०:२५० ग्रॅम नत्र:स्फुरद:पालाश पहिले पाणी देतेवळी द्यावे. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा गाठ सेट झाल्यानंतर दोन ते तीन हप्त्यांत विभागून द्यावी. तसेच बहर धरतेवळी २०० ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेटची मात्रा द्यावी. फळे लिंबू आकाराची असताना ५०० ग्रॅम डीएपी आणि १०० ग्रॅम एमओपी द्यावा. फळे पेरू आकाराची असताना २०० ग्रॅम १९:१९:१९ आणि १०० ग्रॅम एमओपी द्यावा.
विद्राव्य खतांचा वापर करताना झाडाच्या वाढीच्या अवस्थेनुसार १२:६१:०, १९:१९:१९, १३:४०:१३, १३:०:४५, ०:५२:३४ आणि ०:०:५० या ग्रेडचा वापर करावा. संदर्भ - अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस
747
0
संबंधित लेख