गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब पिकातील फळ पोखरणारी अळी.
डाळिंब हे पीक प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यात घेतले जाते. या राज्यांपैकी महाराष्ट्र हे उत्पादनात अग्रेसर असणारे राज्य आहे. भारतात सरासरी १०९.२ हजार हेक्टर क्षेत्रावर हे फळपीक घेतले जाते. या फळपिकांमध्ये महत्वाची कीड म्हणजे फळ पोखरणारी अळी, साल खाणारी अळी, फळातील रसशोषक पतंग, पिठ्या ढेकूण, फुलकिडे तसेच काहीवेळी पोपट आणि चिमणी या पक्षांपासून देखील फळांचे नुकसान होते. यामध्ये ५०% नुकसान हे फळ पोखरणाऱ्या अळीपासून होण्याची शक्यता असते.
डाळिंब पिकातील फळ पोखरणारी अळी 'डाळिंब पतंग' म्हणून देखील ओळखली जाते. हे पतंग पिकामध्ये फुल, कळी किंवा फळांवर अंडी देतात. या अंड्यातून उबणाऱ्या अळ्या फळावर छिद्र करतात आणि आत प्रवेश करतात व आतील भाग खातात. अळीद्वारे तयार झालेल्या छिद्रातून बुरशी व जीवाणू फळांमध्ये प्रवेश करतात त्यामुळे फळे सडतात. प्रादुर्भावग्रस्त फळांमधून फळ सडल्याचा दुर्गंधीत वास येतो. याकारणास्तव फळांची गुणवत्ता खराब होते तसेच फळ गळ समस्यांमुळे उत्पादनावर अधिक परिणाम होतो. डाळिंबाव्यतिरिक्त, ही कीटक आवळा, लिची, सफरचंद, बोर, पेरू आणि चिकू या पिकामध्ये देखील नुकसान करते._x000D_ _x000D_ एकात्मिक कीड व्यवस्थापन:-_x000D_ • नवीन लागवड असल्यास प्रथम ढोलका, काश्मिरी लोकल, बेदाना इत्यादी कमी संवेदनशील वाणांना प्राधान्य द्यावे._x000D_ • नियमित तणांचे नियंत्रण करून बाग स्वच्छ ठेवावी._x000D_ • प्रकाश सापळे लावावेत._x000D_ • प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत. _x000D_ • जेव्हा फळे लिंबाच्या आकाराची असतील म्हणजेच साधारणतः फळधारणेनंतर ३०- ५० दिवसांच्या दरम्यान पेपर किंवा शंकू आकाराची पेपर टोपी किंवा कागदी पिशव्या यांचे फळांना आवरण देऊन या किडीपासून नुकसान कमी केले जाऊ शकते._x000D_ • अंड्यावरील परजीवी ट्रायकोग्रामा एसपी प्रति एकरी २ ते ३ वेळा @ १ लाख द्यावे._x000D_ • पिकामध्ये फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच निंबोळी आधारित पावडर (५%) @५०० ग्रॅम प्रति एकर किंवा निम आधारित कीटकनाशके @१० मिली (१% ईसी) किंवा @४० मिली (०.१५% ईसी) प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. _x000D_ • बॅसिलस थुरिंजेनेसिस हि जिवाणूजन्य पावडर @१५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. _x000D_ • प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी, शिफारस केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
202
1
संबंधित लेख