कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
पीएम-किसानचा दुसरा हप्ता २.६६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने (पीएम-किसान) चा दुसरा हप्ता २.६६ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा कऱण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये २-२ हजार रू. हस्तांतरित करण्यात आले आहेत. केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम-किसान योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशच्या पहिल्या हप्ता १,११,६९,३४९ लाभार्थीना आणि राज्याच्या १,०८,४८,६६७ शेतकऱ्यांना दुसरा हप्ता जमा करण्यात आला आहे. सिंग म्हणाले की,
या योजनेची अंमलबजावणी पूर्ण मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली आहे. या अंतर्गत, तीन टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांनामार्फत दिलेली सूचना व डाटा आणि त्यांच्या बँक खात्यांची पडताळणी करून केंद्र सरकारच्यावतीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये योजनेचा निधी ऑनलाइन (डीबीटी) पध्दतीने जमा केली जाते. हा संबंधित डाटा राज्य सरकारव्दारा दिला जातो. संदर्भ – आऊटलुक अॅग्रीकल्चर, १८ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
112
0
संबंधित लेख