कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
फक्त ९ राज्यांमध्ये डाळवर्गीय-तेलवर्गीय उत्पादनाची खरेदी
केंद्र सरकारने पंतप्रधान अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना अंतर्गत चालू रबी हंगाम २०१८-१९ मध्ये केवळ ९ राज्यांमधूनच डाळवर्गीय व तेलवर्गीय उत्पादनाची खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. या ९ राज्यांमधूनच डाळवर्गीय व तेलवर्गीय उत्पादनाची खरेदी एकूण २४ टक्के करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
नाफेडच्या एका वरिष्ठ अधिकारीनुसार, चालू रबी हंगाम २०१८-१९ मध्ये डाळवर्गीय व तेलवर्गीय उत्पादनाची खरेदी तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांमधून केली जाईल. त्याचबरोबर या राज्यांमधून हरभरा, सुर्यफूल, भुईमूग, मूग, उडीद, मसूर आणि मोहरीचे किमान समर्थन मुल्यवर (एमएसपी) ४३,८९, ७८७ टन खरेदी करण्याचे लक्ष्य आहे. चालू रबी २०१८-१९ मध्ये समर्थ मुल्यवर हरभरा २२,२४,८२३ टन, मसूर २,८१,१६५ टन किंवा १६.५८ लाख टन मोहरीचे उत्पादन लक्ष्य करण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय भुईमूग ६३,००० टन, मूग ४३,२२८ टन आणि उडीद १,२८,८१५ टन उत्पादन खरेदी करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ३० मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
8
0
संबंधित लेख