कृषि वार्ताकृषी जागरण
‘सोलर ट्री’ लावा, मोफत वीज मिळवा!
सोलर पॅनल मोठया आकाराचे असल्यामुळे ते कुठे ही लावण्यास शक्य नाही. या समस्येला दूर करण्यासाठी दुर्गापुरच्या सेंट्रल मॅकानिकल इंजिनिअरींग रिसर्च इंस्टीट्यूटच्या वैज्ञानिकांनी सीएमईआरआई)) एक ‘सोलर ट्री’ तयार केला आहे. जेणेकरून ते घरात लावून आयुष्यभर वीज अगदी मोफत मिळू शकते. मिनिस्ट्री ऑफ सायन्सच्या अंतर्गत असणारी सीएमईआरआईने जालंधरमध्ये आयोजित केलेल्या १०६ व्या इंडियन सायन्स कांग्रेसमध्ये या ‘सोलर ट्री’ चे प्रदर्शन करण्यात आले. वैज्ञानिकांच्या मते, एक किलोवॅटचे सोलर ट्री शेतकऱ्यांना पंप चालविण्यास ही सक्षम राहीन, तसेच एक किलोवॅटवाले सोलर ट्री ने ४-५ खोलीत वीज येईल व त्याचबरोबर पंखे ही सर्व खोलीत लावता येतील. पॅनल अशा पध्दतीने लावला गेला आहे की, सुर्य मावळतीपर्यत सर्व दिशांनी किरणे या पॅनलवर पडली जातील सोलर ट्री मध्ये एक असा सेंसर लावला गेला आहे की, रात्र झाली तरी, रस्त्यावरचे दिवे ही लावले जातील.
या पॅनलला एक वर्ग मीटरच्या जागेत अगदी सोप्या पध्दतीने लावू शकतात. एकवॅट क्षमता असणारे सोलर ट्री ची ऊंची जवळजवळ ६ फीट आहे, यामध्ये ४-५ पॅनल लावले जाऊ शकतात. १० किलोवॅटच्या सर्वात मोठया पॅनलसाठी २० फुट लांब सोलर ट्री ची आवश्यकता आहे. या ट्री वर ४० ते ५० सौर पॅनल ही लावले जाऊ शकतात. संदर्भ - कृषी जागरण, १० जानेवारी २०१९
268
0
संबंधित लेख