कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कीटकनाशक, बियाणेसंबंधित या दोन विधेयकाला मिळणार मंजुरी!
नवी दिल्ली – कीटकनाशक व्यवस्थापन व बियाणेसंबंधित असणारे दोन विधेयक संसदेच्या पुढील अधिवेशनात मंजूर होण्याची अपेक्षा आहे. कृषी राज्यमंत्री परषोत्तम रूपाला म्हणाले की, कीटकनाशक व्यवस्थापन विधेयकात दर ठरवून नियामक प्राधिकरण स्थापन करून, कीटकानाशक क्षेत्राच्या कायदयावर जोर देण्यात आला आहे.
हे विधेयक कीटकनाशक अधिनियम १९६८ ची जागा घेईल. त्याचवेळी बियाण्याचे उत्पादन, वितरण आणि विक्री नियमित करण्यावर जोर दिला जाईल. हा बीज कायदा १९६६ ची जागा घेईल. विधेयकातील अनुवांशिकरित्या सुधारित पिकांच्या तरतुदीमुळे विविध क्षेत्रातील लोकांच्या टीकेमुळे हे विधेयक २०१५ मध्येच स्थगित करण्यात आले होते. रूपाला यांनी उद्योग मंडळ एसोचैम कार्यक्रमात म्हणाले की, आम्ही कीटकनाशक व्यवस्थापन आणि बियाणे या दोन महत्त्वपूर्ण विधेयकावर काम करत आहोत. ते संसदेच्या पुढील अधिवेशनात मंजूर होईल ही अपेक्षा आहे. शासन भेसळयुक्त कीटकनाशके व बियाणे यांच्या विक्रीबाबत चिंतेत आहे. या विधेयकामागील उद्देश याचे समाधान होणे हा आहे. या विधेयकबाबत संसदेची स्थायी समितीने अहवाल सादर केला आहे. विधेयकात कीटकनाशकांची नव्याने व्याख्या केली आहे. यामध्ये निकृष्ट दर्जाचे, भेसळयुक्त किंवा हानिकारक कीटकनाशके आणि इतर निकषांचे नियमन केले गेले आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १९ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
92
0
संबंधित लेख