AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Jul 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेवगा पिकांमधील किडींचे व्यवस्थापन
शेतकऱ्यांना शेवगा पिकाची लागवड करणे अत्यंत फायदेशीर आहे. तथापि, काही किडी पिकांचा नाश करतात. मुख्यतः पाने खाणारी अळी, कोंब खाणारी अळी, रसशोषक किडी (पांढरी माशी, फुलकिडे, आणि मावा), साल खाणारी कीड, खोड कीड आणि फळ माशी यांमुळे पिकाचे नुकसान होते. यापैकी, सर्वात जास्त प्रमाणात शेवगा पिकात पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम): • शेतीमध्ये लाईट सापळे लावावे. पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव आढळून येताच, आपण रसशोषक किडी आणि अळीच्या नियंत्रणासाठी निंबोळी बियांपासून केलेला अर्क ५% (५०० ग्रॅम) किंवा नीम आधारित फॉर्म्युलेशन्स @ १० मिली (१% ईसी) किंवा ४० मिली (०. १५% ईसी) प्रमाणाने फवारणी करावी. तसेच आपण जैविक बुरशीनाशकांची जसे व्हर्टिसिलियम लॅकेनी किंवा बेव्हरिया बॅसियाना, बुरशी आधारित पावडर @ ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्याच्या प्रमाणाने फवारणी करावी. • खाली पडलेल्या आणि निरुपयोगी शेंगा गोळा करून जमिनीमध्ये गाडून टाकाव्यात. • सर्व गळून पडलेल्या आणि खराब झालेल्या शेंगा गोळा करून नष्ट करा आणि खड्डयामध्ये गाडून मातीचा जाड थर भरून झाकून ठेवा. • फळ माशीच्या नियंत्रणासाठी, पीक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असताना निम अर्काचा साधारणतः ३५ दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारण्या घ्याव्या.
डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
595
130