गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
(भाग-२) टोमॅटोवरील तिरंगा समस्या
४. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन- टोमॅटो लागवडीपासून पीक वाढीच्या विविध अवस्था व वातावरणात वेगवेगळ्या कीड/रोगांचा प्रादुर्भाव होतो. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळोवेळी करणे आवश्यक असते. यामध्ये सर्वात घातक म्हणजे सफेद माशी आणि फुलकिडे (थ्रिप्स) यांवर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. याचे व्यवस्थापन आणि प्रतिबंध होण्यासाठी आळवणी तसेच फवारणीमधून थायोमिथोक्साम, इमिडा, फिप्रोनील, डेल्टामेथ्रीन, डायफेनथुरोन, स्पिनोसॅड इ. कीटकनाशकाचा वापर करावा. ५. ३विषाणूजन्य रोगाची काळजी- टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस या विषाणूजन्य रोगामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतो. ज्याद्वारे उत्पन्नाची गुणवत्ता खालावत असल्यामुळे वेळोवेळी कीड नियंत्रण करावे. ज्यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा (पिवळे-निळे चिकट सापळे) अवलंब करावा. किडींचा अभ्यास करून योग्य असे कीटकनाशक फवारणीसाठी वापरावे. ६. नियमित पाणी व्यवस्थापन- कोणत्याही पिकाला नियमीत, वेळच्या वेळी आणि योग्य प्रामाणात पाणी पुरवठा केल्यास त्याचा चांगला प्रभाव उत्पादन वाढीवर आणि गुणवत्तेवर जाणवतो. म्हणून पाणी देण्याच्या वेळा, दिवस, दोन पाण्याच्या पाळीमधील अंतर हे पिकांची अवस्था, मातीचा प्रकार आणि वातावरण यानुसार ठरवावे. यामध्ये शक्य तेवढे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करावा.
७. तापमानापासून पीक रक्षण- टोमॅटो लागवड बहुतांशी वेळा उन्हाळी हंगामात घेतले जाते. जेव्हा उष्णता वाढून तापमान 35 अंश से. च्या पुढे जाईल, अशा वेळी टोमॅटो फळातील लायकोपीन नावाचे रंगद्रव्ये मृत पावते. ज्यामुळे फळाला एकसारखा लाल रंग येत नाही. म्हणूनच उन्हाळी हंगामातील लागवडीला शक्यतो सेंद्रिय अथवा सफेद प्लॅस्टिक मल्चिंगचा वापर करावा. ज्यामुळे तापमान कमी करण्यास फायदा होऊन उत्पादन चांगले मिळेल. ८. तिरंगी फळे दिसू लागल्यास उपाय- अगोदर प्रतिबंधक उपायांचा अवलंब न केल्यास फळ तोडणी होताना तिरंगी फळांचे प्रमाण वाढते. त्यावर तातडीचा उपाय म्हणून सफेद मुळी सक्रीय होण्यासाठी ठिबकमधून ह्युमिक प्रत्येक आठवड्याला सोडावे. त्यानंतर प्रत्येक ८ दिवसांनी एकरी पोटॅशियम शोनाईड ५ किलो, कॅल्शियम नायट्रेट ५ किलो, मॅग्नेशियम सल्फेट ५ किलो, बोरॉन ५०० ग्रॅम हे वेगवेगळ्या वेळी द्यावे. सोबतच तापमान व वातावरणाचा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक १५ दिवसांनी सिलिकॉन २०० मिली, व्हायरसपासून प्रतिबंध होण्यासाठी किटोगार्ड २५० मिली एकत्रित फवारणी करावी, जोडीला ठिबकमधून समुद्री शेवाळी अर्क वापर फायदेशीर राहील. टोमॅटोच्या तिरंगा या समस्येवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी जमीन मशागतीपासून ते काढणीपर्यंत वेगवेगळे उपायांचा वापर वरीलप्रमाणे करावा. संदर्भ – तेजस कोल्हे (वरिष्ठ कृषी तंज्ञ) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
406
1
संबंधित लेख