AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
16 Mar 19, 06:00 PM
जैविक शेतीअॅग्रीकल्चर फाॅर एव्हरीबडी
(भाग-१) माशांपासून तयार केलेले जैविक खत
माशांपासून तयार केलेले जैविक खत (गुनापासेलम) झाडांसाठी एक उत्कृष्ट टॉनिक आहे. हे झाडांना नायट्रोजन (८% -१०% झाडांच्या आवश्यकतेनुसार) वाढ होण्यास मदत करते. हे अमीनो अॅसिड, जीवाणू, सुक्ष्म अन्नद्रव्यचा एक महत्वपूर्ण स्त्रोत आहे. जे मातीच्या खत क्षमतेला वाढविते.
हे खत नैसर्गिक वाढ आणि कीटकनाशक दोन्हींसाठी प्रभावी आहे. हे दुसऱ्या घटकांसोबत मिसळून वापरावे. जेणेकरून मुळांना खाणाऱ्या किडींवर ही प्रभावी नियंत्रण करण्यास मदत करते. या जैविक खतामध्ये पोषक तत्व प्रचंड प्रमाणात असतात. जसे की, यामध्ये (N, k, Ca, Mg, P व S) आणि सूक्ष्मतत्व (C1, Fe, B, Mn, Zn, Cu, Mo व Ni) यांचा समावेश असतो. _x000D_ हे खत वापरण्याच्या पध्दती:_x000D_ • या खतांचा वापर झाडांच्या पानांवर केला पाहिजे. शेतीमध्ये सांयकाळच्या वेळी पाण्यामध्ये ३ ते ५ टक्क्यापर्यंत फवारणी केली पाहिजे. कारण यामुळे झाडांची वाढ चांगली, योग्य फुले आणि उत्पन्न वाढीलादेखील मदत होते. _x000D_ • जर कोणाजवळ अधिक मासे व माशांचा कचरा असेल, तर या खतांना सिंचनाच्या दरम्यानदेखील पाण्यामध्ये मिसळू शकतात (२ लि प्रति १०० लि पाणी)_x000D_ • या माशांपासून ३ ते १० किग्रॅ टॉनिक तयार केले जाते. या टॉनिकचे प्रमाण एक एकर शेतीमध्ये पुरेसे होते._x000D_ _x000D_ संदर्भ: अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सीलेंस_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
472
0