AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Sep 19, 06:30 PM
जैविक शेतीअॅग्रोवन
पॅसिलोमायसीस लीलासिनस
पॅसिलोमायसीस लीलासिनस ही अनेक प्रकारच्या मातीत नैसर्गिकरीत्या आढळणारी बुरशी आहे. ही बुरशी वनस्पतीच्या मुळांवर हल्ला करणाऱ्या सुत्रकृमीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. त्याचबरोबर २१ ते ३२ अंश तापमानात चांगली वाढते. तर तापमान ३६ अंशच्या पुढे गेल्यास टिकू शकत नाही. तसेच अंडी, कोश आणि प्रौढ मादी अशा सर्व अवस्थामध्ये संसर्ग करते. पिके - वांगे, बटाटा, मिरची, टोमॅटो, काकडी, फुले इत्यादी.
लक्ष्य कीटक - मातीमधील वनस्पती परजीवी सुत्रकृमी. उदा, रूट नॉट निमॅटोड, सिस्ट निमॅटोड, रेनिफोर्म निमॅटोड वापरण्याची पद्धत -१ किलो प्रति एकर २०० लि. पाण्यामध्ये मिसळून आळवणी करावी. मात्रा: मातीमध्ये २ किलो प्रति एकर शेणखतामध्ये मिसळून वापरावे. संदर्भ – अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
114
0