जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जैविक कीड नियंत्रण (अग्निअस्त्र)
पिकांमधील कीड नियंत्रणासाठी अग्निअस्त्र हे एक जैविक कीटकनाशक म्हणून वापरले जाते. कमी खर्चामध्ये हे जैविक कीटकनाशक तयार करण्याची पद्धत: अग्निअस्त्र लागणारे साहित्य- गोमूत्र २०० लिटर कडूलिंबाची पाने २ किलो तंबाखू अर्धा किलो बारीक केलेली हिरवी मिरची अर्धा किलो बारीक केलेला लसून अर्धा किलो हळदी पावडर २०० ग्रॅम
तयार करण्याची पद्धत – हे सर्व मिश्रण भांड्यात एकत्र करून लाकडाने व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर, त्या भांडयावर झाकण ठेवून ते मंद जाळावर गरम करावे. यानंतर ते मिश्रण थंड होण्यास ठेवावे. हे थंड झालेले मिश्रण दिवसातून दोन वेळा ढवळून घ्यावे. या मिश्रणाला थंड हवेच्या ठिकाणी २-४ दिवस ठेवावे. हे मिश्रण कापडाच्या साहाय्याने भांड्यामध्ये गाळून ठेवावे. या द्रावणचा उपयोग सर्व किडींच्या नियंत्रणासाठी होतो. वापरण्याची पद्धत १०० लिटर पाण्यामध्ये ३ लिटर द्रावण किंवा १५ लिटर पाण्यामध्ये ३००-४०० मिली अग्निअस्त्र मिसळून फवारणी करावी. हे जैविक कीटनकाशक (अग्निअस्त्र) प्रकारच्या अळीच्या नियंत्रणासाठी वापरता येते. संदर्भ - अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस। जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
852
2
संबंधित लेख