AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
21 फेब्रुवारीला दिल्लीत होणार सेंद्रिय खाद्य महोत्सव
सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादनांच्या प्रक्रियेत महिला उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी 21 फेब्रुवारीपासून दिल्ली येथे तीन दिवसीय 'सेंद्रिय खाद्य महोत्सव' आयोजित करण्यात येणार आहे.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल म्हणाल्या की, महिला व बाल विकास मंत्रालय, राष्ट्रीय खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान उद्योजकता व व्यवस्थापन आणि भारतीय उद्योग संघ (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2020 दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 150 हून अधिक महिला उद्योजक, बचतगट आणि गुजरातचे दोन सहकारी गट यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात प्रवेश विनामूल्य आहे. ते म्हणाले की, सेंद्रिय शेती करणारे जास्तीत जास्त शेतकरी भारतात आहेत, तर क्षेत्राच्या दृष्टीने आपण सेंद्रिय शेतीच्या बाबतीत 9 व्या क्रमांकावर आहे. सध्या देशातील सेंद्रिय उत्पादनांचा व्यवसाय 2015 मध्ये 2700 करोड रुपये होता, जो 2025 पर्यंत 75000 करोड रुपयांपर्यंत पोहोचेल. मागणीच्या तुलनेत देशात सेंद्रिय उत्पादनांचे उत्पादन फारच कमी आहे. हे पाहता या क्षेत्रात अनेक संधी असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगितले. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, 13 फेब्रुवारी 2020 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
51
1