AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Mar 20, 01:00 PM
कृषी वार्ताअॅग्रोवन
अखेर कांदा निर्यात होणार १५ मार्चपासून
पुणे – केंद्र शासनाने लागू केलेली कांदा निर्यातबंदी अखेर विनाअटीशर्ती उठविली आहे. १५ मार्चपासून कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरव्दारे दिली, यानंतर वाणिज्य मंत्रालयाकडून यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आल्याने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. कोसळणारे दर व निर्यातबंदी उठविण्यासंदर्भात नाशिक जिल्हयातील बाजार समित्यांत आज शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून जोरदार आंदोलन केले होते. यानंतर वाणिज्य मंत्रालयाने अखेर पतपत्र व किमान निर्यात मुल्याची कोणतीही अट न टाकता निर्यातबंदी उठविण्यात आल्याने यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईन. केंद्रीय अन्न मंत्री रामविलास पासवान यांनी कांदयावरील निर्यातबंदी उठविण्यात आल्याची माहिती २६ फेब्रुवारीस दिली होते. मात्र यासंदर्भातील परिपत्रक काढण्यात आले नव्हते. मात्र या आंदोलनामुळे अखेर निर्यातीवरील बंदी उठविण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. संदर्भ - अ‍ॅग्रोवन, २ मार्च २०२० ही महत्वपूर्ण बातमी लाइक करा व आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
652
14