AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्तापुढारी
यंदा १ हजार ३७ टन आंबा निर्यात
राज्य कृषी पणन मंडळाच्या निर्यात सुविधा केंद्राचा उपयोग करून संपलेल्या हंगामात आंब्यांची १ हजार ३७ टन निर्यात पूर्ण झालेली आहे. पणन मंडळ, कृषी विभाग, अपेडा यांच्या संयुक्त प्रयत्नांना यश आले असून निर्यातीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली. हापूस, केशर, बैगनपल्ली, लंगडा, चौसा आदि आंब्यांची निर्यात देशातून झालेली आहे. त्यामध्ये पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करून युरोपियन युनियन, रशिया, न्यूझीलंड, जपान, मॉरिशियस या पाच देशांना सर्वाधिक आंबा निर्यात प्रथमच झालेला आहे. पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील म्हणाले की, यंदा समुद्रमार्गी आंब्यांची निर्यात प्रथमच झाली आहे. पुढील हंगामात युरोपात समुद्रामार्गे आंबा निर्यात मोठया प्रमाणात करण्याची संधी आहे. त्यामुळे भारतीय आंबा बाजारात स्पर्धात्मकरीत्या उतरू शकेल. संदर्भ – पुढारी, ५ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
47
0