कृषि वार्तापुढारी
तीन किलोंचा एक आंबा ५०० रूपयांना!
फळांचा राजा म्हणून आंबा ओळखला जातो, परंतु आंब्याची राणी कोण आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसेल. मूळ अफगाणिस्तानातील आंब्याची प्रजाती नूरजहाँ ही आंब्याची राणी म्हणून प्रसिध्द आहे. नूरजहाँची काही मोजकीच झाडे मध्य प्रदेशातील अलीराजपूर जिल्हयातील कट्ठीवाडा भागात तग धरून आहेत. या आंब्याचे वैशिष्टय म्हणजे साधारणत तीन किलोचा एक आंबा ५०० रूपयांना पडतो!
नूरजहाँ आंब्यांचे उत्पादन मर्यादित असल्याने आंबे शौकिन ते झाडावर असतानाच अॅडव्हान्स बुकिंग करून ठेवतात. मागील वर्षी रोगराईमुळे या आंब्याचे उत्पादन खूपच कमी झाले होते. यंदा मात्र निसर्गाने साथ दिल्याने चांगली परिस्थिती आहे, अशी अपेक्षा या भागातील शेतकऱ्यांना आहे. नूरजहाँ झाडांवर जानेवारीपासूनच मोहोर धरायला लागतो. जून अखेरपर्यंत तर फळ पिकून तयार होते. या आंब्यांचे सर्वसाधारण: वजन ३.५ ते ३.७५ किलो असते. यंदा ते सुमारे २.५ किलो भरण्याची अपेक्षा आहे. संदर्भ – पुढारी, २० मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
97
0
संबंधित लेख