AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
31 Mar 19, 06:00 PM
पशुपालनअॅग्रोवन
म्हशी व गाईंचे अधिक दूध उत्पादनसाठी पोषण व्यवस्थापन
आहार व्यवस्थापन: • अपुऱ्या आहारामुळे दूधाळ जनावरांची शारीरिक वाढ, दूध उत्पादन, प्रजनन व शरीर स्वास्थ्य यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. चांगल्या पशू आहार व्यवस्थापनाची सुरूवात संक्रमण काळापासूनच करावी. • जनावरांना उच्च प्रतीची प्रथिने व ऊर्जायुक्त आहार आणि त्यांचे एकूण शुष्क पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढविल्यास अपेक्षित परिणाम दिसू लागेल. • जनावरांचे वजन आणि त्याचा प्रकृती अंक यावर बारीक लक्ष ठेवावे. गाय, म्हैस व्यायल्यानंतर तीन आठवडे योग्य काळजी घेतली पाहिजे. या काळातील ऊर्जेची कमतरता ही बायपास फॅट व इतर पशुखाद्य पुरके देऊन पूर्ण केली, तर उर्वरित काळात चांगले दूध उत्पादन मिळू शकेल. • गाय, म्हैस उच्च दूध उत्पादनाला पोहोचली, की त्यानंतरचे खाद्य हे दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिले पाहिजे.
• दुभत्या गाई, म्हशींना लागणारे एकूण खाद्य - चारा, त्यातील प्रथिने, ऊर्जा आणि त्याचे चांगले पचन होण्यासाठी लागणारे तंतुमय पदार्थ याबरोबरच इतर खनिजे व पुरके यांचे प्रमाण पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रमाणित करावे. नवीन मिश्र खाद्य किंवा टीएमआर तंत्रज्ञान पशुखाद्य आणि चाऱ्याचा पुरेपूर वापर व पोटातील आम्लता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे._x000D_ संदर्भ - डॉ.पराग घोगळे, अॅग्रोवन २५ फेब्रुवारी २०१९_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
506
6