AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
31 May 19, 11:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शेवगा पिकामधील अन्नद्रव्य व्यवस्थापन
• शेवग्याला वर्षातून दोनदा बहार येतो. हा बहार येताना खतांचा वापर करणे गरजेचे आहे. • छाटणी झाल्यावर प्रति एकर झाडांना १०-१२ टन शेणखत द्यावे. शेणखताबरोबरच रासायनिक खतांचादेखील वापर करावा. • प्रति एकरी ५० किलो युरिया, ५० किलो डी.ए.पी आणि ५० किलो पोटॅश हे खत द्यावे. त्यानंतर ३० ते ४० दिवसांनी पुन्हा एकदा एकरी ५० किलो युरिया द्यावा. • माती परिक्षणानुसार जमिनीचा प्रकार आणि झाडाची वाढ यानुसार नत्राचे प्रमाण कमी-जास्त करावे. • पहिला बहार निघाल्यानंतर नवीन पालवी फुटून फुले येऊ लागतात, अशावेळी पुन्हा एकदा वरीलप्रमाणे खतांचे नियोजन करावे. • या प्रकारे वर्षातून दोनदा रासायनिक खतांचा वापर करावा. त्याचबरोबर सेंद्रिय खतांचा जास्त प्रमाणात वापर वाढविल्यास शेंगा, रंग, चकाकी आणि प्रत सुधारते. शेवग्याचा शेंडा जास्त वाढत असल्यास, नत्र वापर कमी करावा. • शेगांची फुगवण कमी होत असल्यास तसेच फूलगळ कमी होऊन शेगांची संख्या वाढविण्यास स्फुरद खतांचा वापर जास्त करावा. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेंस
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
392
47