AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
21 Jul 19, 06:30 PM
पशुपालनगांव कनेक्शन
जनावरे खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
काही पशुपालक इतर ठिकाणावरून दुग्ध जनावरांची महाग किंमती देऊन खरेदी करतात. तथापि, त्यानंतर असे आढळून येते की, पशु विक्रेत्याने सांगितल्याप्रमाणे जनावरापासून तेवढे दुधाचे उत्पादन मिळत नाही, अशा परिस्थितीत पशुधन पैदास करणाऱ्यांना आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. हे नुकसाने होऊ नये यासाठी पशुपालकाने खालील गोष्टींची काळजी घ्यावी. शरीराची रचना: निरोगी जनावराचे शरीर समोरच्या भागात जाड तर मागच्या बाजूने पातळ असते. त्यांचे नाक खुले, जबडा मजबूत, आकर्षक डोळे, लांब शेपटी व मऊ व त्याचबरोबर त्वचा पातळ असावी. छातीचा भाग विकसित आणि पाठ रुंद असावी. दुधाचे उत्पादन: दुधाच्या जनावरांचे बाजारपेठेचे मूल्य हे उत्पादित दुधाचे प्रमाण ठरवते; म्हणून जनावरे खरेदी करण्यापूर्वी २ - ३ दिवस स्वतः जनावरांच्या दुध देण्याच्या प्रमाणाची तपासणी करावी. वयः सामान्यतः वासराची पैदास करण्याची क्षमता १० ते १२ वर्षे वयानंतर संपते. तिस-या किंवा चौथ्या वासरापर्यंत दुध उत्पादन देण्याची क्षमता चांगली असते, जी हळूहळू कमी होते. जनावरांची वय त्यांच्यातील दात आणि आकारावरून ओळखली जाते. संदर्भ : गाव कनेक्शन
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
889
2