कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
बिगर बासमती तांदळाची निर्यात झाली कमी
बांग्लादेशसोबत अफ्रीका या देशाने आयातची मागणी कमी केल्याने बिगर बासमती तांदळाचे निर्यातीचे प्रमाण कमी झाले आहे. वित्त २०१८-१९ च्या पहिल्या ११ महिने म्हणजेच एप्रिल ते फ्रेबुवारीच्या दरम्यान बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीमध्ये १६.५५ टक्क्यांची घट झाली असून एकूण निर्यात ६७.११ लाख टन झाली आहे.
कृषी व प्रसंस्कृत खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण (एपीईडीए) एपिडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार, मागील वर्षी बांग्लादेशजवळ तांदळाचा पुरवठा कमी होता. ज्यामुळे बिगर बासमती तांदळाचा भारतातून रेकॉर्ड निर्यात झाला होता, पण चालू हंगामात बांग्लादेशजवळ जास्त पुरवठा असल्या कारणाने आयातची मागणी कमी झाली आहे. मागील वित्त वर्ष २०१७-१८ मध्ये एप्रिल ते फ्रेबुवारी दरम्यान बिगर बासमती तांदळाची निर्यात ८०.४२ लाख टन झाली होती. जे की वित्त वर्षी याची निर्यात ६७.११ लाख टन ही झाली आहे. वित्त वर्ष २०१७-१८ मध्ये बिगर बासमती तांदळाची एकूण निर्यात २२,९६७.८२ करोड रू. ची ८६.४८ लाख टन ही झाली होती. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, 12 एप्रिल 201 9 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0
संबंधित लेख