कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
साखर कारखान्यांनी इथेनॉल बनविण्यावर जोर द्यावा - गडकरी
नवी दिल्ली – भारतासह जगभरात साखरेचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्याने साखर उद्योग अडचणीत आला आहे. मात्र, सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी असून साखर कारखान्यांना केवळ साखरनिर्मितीवर अवलंबून न राहता इथेनॉल व अन्य उत्पादनांवर जोर दयावा असा सल्ला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे आयोजित 'साखर परिषद २०२०' च्या समारोप सत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. गडकरी म्हणाले, केंद्र सरकारने इथेनॉलवर एक पारदर्शी धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार पेट्रोलियम कंपनी इथेनॉलला खरेदी करण्यासाठी तयार आहेत. त्याचबरोबर शासन साखर उदयोगांना पुन्हा उभारणी मिळावी यासाठीदेखील खूप प्रयत्न करत आहेत. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ८ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
16
0
संबंधित लेख