कृषि वार्ताकृषी जागरण
भाताचे नवीन वाण विकसीत!
भारतीय कृषी संशोधन संस्था (आयसीएआर) द्वारा भाताचे नवीन वाण विकसित केली आहे. भाताच्या या नव्या वाणामुळे त्याचे उत्पन्न अधिक वाढेल आणि शेतकऱ्यांना ही त्याचा दुप्पट फायदा होईल. सीएसआर - ४६ हे वाण १३० ते १३५ दिवसात तयार होते यामध्ये १०० ते १०५ दिवसानंतर फूल येण्यास सुरूवात होते. या रोपांची लांबी ११५ सेमी असते. हे (NDRK ५००३५) वाणाच्या तुलनेत ३६% अधिक पैदास देते. हे वाण सामान्य जमीनवर देखील उगवू शकते. हे ६५ क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत उत्पन्न देऊ शकते तसेच नापीक असलेल्या (कलराठी) जमिनीवरदेखील ४० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
सी.एस.आर- ५६ हे वाण १२० ते १२५ दिवसात तयार होतात यामध्ये ९० ते ९५ दिवासत फूल येण्यास सुरूवात होते. या रोपांची लांबी १०० सेमी होते. विभिन्न प्रकारची मातीत सरासरी ७० क्विंटल प्रति हेक्टरपर्यत उत्पन्न मिळू शकते. जेणेकरून, सौम्य व लवचिक मातीमध्ये ४३ क्विंटल उत्पन्न मिळते. सी.एस.आर- ३६ हे वाण तयार होण्यास १२५ ते १३० दिवस लागतात. हे वाण लवचिक जमिनीसाठी सक्षम असतात त्याचबरोबर हे अधिक उत्पन्न देणारे भाताचे वाण असून बी.पी.टी २२०४ आणि (जयाच्या तुलनेत क्रमश: ९%, ५३% आणि ४३% अधिक उत्पन्न देते. हे वाण प्रति हेक्टर ७० क्विंटलपर्यंत उत्पन्न देते. हे तीन वाण लीफ ब्लास्ट, नेक ब्लास्ट, शीथ ब्लाइट, बैक्टीरियल लीफ ब्लाइट, ब्राउन स्पॉट या रोग सहन करण्यास सक्षम आहेत. त्याचबरोबर लीफ फोल्डर आणि तुडतुडे या कीटकांनादेखील सहन करण्यास हे वाण सक्षम आहेत. आईसीएआर यांनी हे तीन वाण उत्तर भारताच्या मैदानी क्षेत्रात उगविण्यासाठी शिफारस केले आहे. संदर्भ – कृषी जागरण, ०९ फेब्रुवारी २०१९
151
0
संबंधित लेख