कृषि वार्तापत्रिका
आता, पिकांवरील रोग ओळखता येईल
आता शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान पोहोचविणाऱ्या रोग व कीटकांचा शोध लवकरच एका स्मार्टफोनच्या माध्यमातून कळण्यास मदत होणार आहे. या नव्या तंत्रज्ञानाचा शोध नॉर्थ केरोलिनाचे वैज्ञांनिकांनी डिझाइन केला आहे. जेणेकरून शेतकरी सोईस्कररीत्या या स्मार्टफोनशी जोडले जातील. यानंतर शेतकरी या गोष्टीचे आकलन करू शकतात की पिकांच्या पानांद्वारे कम्पाउंड (बाष्पशील कार्बनिक यौगिक) सोडले जाऊ शकतात. या माध्यमातून आठवडा व महिन्यातून एकदा रोपांचे निरीक्षण केले जाईन व सॅम्पल प्रयोगशाळेत पाठविले जाते. नॉर्थ केरोलिना स्टेट विदयापीठात प्लांट पॅथोलॉजीचे प्रोफेसर जीन रिस्तैनो यांनी सांगितले की, हे नवीन तंत्रज्ञान जलदरीत्या पिकांवरील रोग ओळखण्यास मदत करतील, यामुळे पिकांचे नुकसान टाळण्यास मदत होईन. पिकांमध्ये होणाऱ्या रोगांचा शोध घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक पान स्वत:जवळ ठेवायला लागेल, जेणेकरून १५ मिनिटानंतर त्या पिकांवरील रोग समजण्यासाठी पडताळणी करता येईल. संदर्भ: पत्रिका, ६ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
98
0
संबंधित लेख