कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
पशुपालनमध्ये नवीन तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे वाढणार उत्पन्न!
नवी दिल्ली – पशुपालनमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यावर जोर देणार आहे. पशुपालन, डेयरी व मस्त्यपालन मंत्री गिरीराज सिंह व राज्य मंत्री संजीव बालियान यांनी सांगितले की, गुजरातच्या आनंद जिल्हयातील जकरिया गावात ३६८ शेतकरी पशुपालनाचे काम करत आहे, जे की अमूलचे दूध विकत आहेत. यामध्ये ७० टक्के शेतकरी असे आहेत की, त्यांच्याकडे एक एकरपेक्षा ही कमी जमीन आहे.
या शेतकऱ्यांच्या जनावरांचे शेण एका बायोगॅस प्लॉटमध्ये टाकले जाते. यापासून तयार झालेल्या गॅसची पूर्ती घरामध्ये केली जाते. त्याचबरोबर बायोगॅसपासून जे बायो स्लरी निघते त्याला दोन प्रति दराने विकले जाते. या प्लॉटने दैनिक आधारवर २२ टन बायो स्लरी निघते. शून्य बजेटच्या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गुजरातच्या आनंद जिल्हयात एक पायलट परियोजना सुरू केली आहे. जर ही परियोजना यशस्वी झाली तर देशात सर्व राज्यात ही योजना राबविण्यात येणार आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ४ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
91
0
संबंधित लेख