कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
अधिक प्रोटिनयुक्त गहूचे नवीन वाण असलेले बियाणे ऑक्टोबरमध्ये उपलब्ध!
देशामध्ये विकसित असलेल्या आतापर्यंत सर्वात अधिक प्रोटीनयुक्त गहूचे नवीन वाण एचडी-३२२६(पूसा यशस्वी) चे बियाणे पूसा संस्थानमधून शेतकऱ्यांना ऑक्टोबरमध्ये मिळणार आहे. याची प्रति हेक्टर सरासरी उत्पादन ५७.५ क्विंटल आहे.
भारतीय कृषी अनुसंधान संस्थान (आईएआरआई) चे अनुवांशिक विभागाचे प्रधान वैज्ञानिक डॉ. राजबीर यादव यांनी सांगितले की, गहूचे नवीन वाण एचडी-३,२२६ चे बियाणे शेतकऱ्यांना ऑक्टोबरमध्ये पूसा कॅपसमधून मिळणार असून, ते चालू रबीमध्ये सीमित प्रमाणात उपलब्ध होणार आहे. हे बियाणे तयार करण्यासाठी ३५ ते ४० खासगी बीज कंपन्यांमधून एमओयू केले आहे. पुढील वर्षापर्यंत ही बियाणे शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात मिळतील. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण इतर वाणांच्या तुलनेत ०.५० टक्के जास्त आहे. यामध्ये १२.८ टक्के प्रोटीन आहे, जे की दुसऱ्या वाणामध्ये अधिकतम १२.३ टक्के प्रोटीन असते. या वाणामध्ये ग्लूटेनचे प्रमाण जास्त असते. जास्त उत्पादनासाठी २० नोव्हेंबरच्या पहिले शेतकऱ्यांना या वाणाची लागवड केली पाहिजे. याचे सरासरी उत्पादन ५७.५ क्विंटल प्रति हेक्टर आहे. याचे पीक १४२ दिवसांमध्ये तयार होतात. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ५ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
200
0
संबंधित लेख