AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Mar 20, 01:00 PM
कृषी वार्ताऑल गुजरात न्युज, 20 मार्च 2020
पांढर्‍या माशीला आळा घालण्यासाठी कापसाचे एक नवीन वाण विकसित
दिल्ली: पांढरी माशी ही जगातील पहिल्या दहा विध्वंसक किडयांपैकी एक आहे. ज्यामुळे 2000 हून अधिक रोपांच्या जातीचे नुकसान करते आणि 200 विषाणूकरिता वेक्टर म्हणून काम करते. कापूस सर्वाधिक पिकांपैकी एक आहे. 2015 मध्ये पंजाबमध्ये दोन तृतीयांश कापूस पिके या किडयांनी नष्ट केली आहेत. लखनऊ येथील नॅशनल बॉटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय) यांनी या किडीला आळा घालण्यासाठी एक कीटकनाशक प्रतिरोधक कापूस विकसित केला असून, यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियानाच्या फरीदकोट केंद्रात फील्ड परिक्षण सुरू करणार आहेत. एनबीआरआयचे डॉक्टर म्हणाले, "बीटी कापूस हे केवळ दोन किड्यांसाठी प्रतिरोधक आहे. हे पांढर्‍या माशीसाठी प्रतिरोधक नाही. 2007 मध्ये आम्ही पांढर्‍या माशीवर काम करण्याचा निर्णय घेतला होता. हे केवळ कापसाचेच नव्हे तर इतर अनेक पिकांचेही नुकसान करतात. ज्यामुळे या रोगाचा विषाणू पसरतो." या परिक्षणामध्ये दिसून आले की, या वाणातील प्रथिने पांढर्‍या मधमाश्यांसाठी विशेषत: विषारी ठरतात. संदर्भ – ऑल गुजरात न्युज, 20 मार्च 2020 ही माहिती लाइक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा .
29
4