AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
नेपाळने भारतीय फळ व भाज्यांसाठीची तपासणी अनिवार्य केली
नेपाळव्दारा भारतातून येणाऱ्या फळ आणि भाजीपाल्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांची तपासणी अनिवार्य केल्याने, आठवडयाभरात जवळजवळ १० ते ११ टनचे नुकसान झाले आहे. भारताकडून नेपाळला रोज जवळजवळ १, ५०० ते १, ६०० टन ताजे फळ आणि भाज्या मिळतात.
एपीडाच्या अनुसार, नेपाळ भारताकडून दरवर्षी जवळजवळ ६ लाख टन फळ व भाज्या आयात करतो, यामध्ये हंगामानुसार असलेल्या फळांसोबतच भाज्यांची आयात जास्त होते. याव्यतिरिक्त नेपाळ भारताकडून दरवर्षी कांदा १.२० ते १.३० लाख टन आयात करतो. नेपाळ शासनाने भारताकडून येणारे फळ आणि भाज्यांसाठी काठमांडू येथे खादयान्न संस्थानकडून आरोग्य प्रमाण पत्र घेणे अनिवार्य केले आहे, यामुळे आठवडयापर्यंत निर्यात प्रभावित झाली आहे. भारताकडून नेपाळला आता ते फळ आणि भाज्या पाठविल्या जाईल, ज्यामुळे लॅब टेस्टमध्ये हिरवा झेंडा मिळेल. नेपाळ शासनाने हे पाऊल फळ व भाज्यांमध्ये असलेल्या केमिकल मुद्दयामुळे उचलेले आहे. वित्त वर्ष २१८-१९ मध्ये नेपाळने भारतातून कृषी उत्पादनांचे एकूण आयात २२, ०२, ०५.९१ टन केले होते, ज्यामुळे फळ आणि भाज्यांचा वाटा ६.०३ लाख टन होता. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २९ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
22
0