AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Oct 19, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शेतीमध्ये खतांचा उपयोग योग्य पध्दतीने करणे आवश्यक
नवी दिल्ली. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राच्या हिस्स्यामध्ये १४ टक्क्यांची वाढ करून ५० टक्के करण्याची आवश्यकता असून, यासाठी शेतीमध्ये खताचा उपयोग योग्य पध्दतीने करण्याची आवश्यकता असल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिल्लीमध्ये आयोजित बैठकीत सांगितले. केंद्रीय कृषीमंत्री म्हणाले की, मृदा आरोग्य आणि योग्य प्रमाणात खताचा उपयोग पिकांची उत्पादकता वाढविण्यास मदत करतात. शेतकऱ्यांमध्ये खतांच्या उपयोगाबाबत जागृकता होणे गरजेचे आहे. खरीपसोबतच रबी पिकांचे उत्पादन व उत्पादकतासाठी खतांचा उपयोग योग्य प्रमाणात शेतकऱ्यांनी केला पाहिजे, सोबतच मातीच्या स्थितीनुसार खत टाकले पाहिजे. खतांचा योग्य वापर केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न ही वाढेल. खतांचा अधिक वापर केल्याने, शेतीमध्ये सुक्ष्म पोषक घटकांचे नुकसान होते. मृदा आरोग्य सुधारण्यासाठी सुक्ष्म पोषक घटकांची जास्त गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना पिकांचे अवशेष न जाळावे, कारण यामुळे शेतीच्या पोषक तत्वांना नुकसान होऊन सोबतच वायु प्रदुषणदेखील होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २२ ऑक्टोबर २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
92
0