कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
नाफेड मोहरी समर्थन मुल्यपेक्षा कमी किंमतीत विक्री नाही करणार
नवी दिल्ली: मोहरी असलेल्या उत्पादक राज्यांमध्ये मोहरीचे भाव न्यूनतम समर्थन मुल्य (एमएसपी) पेक्षा ही कमी चालले आहे. मात्र राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड (नाफेड) एमएसपी पेक्षा कमी असणाऱ्या किंमतीत विक्री करणार नाही. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले की, सध्या मोहरीची विक्री समर्थन मुल्य ४,२०० रू. प्रति क्विंटलच्या दराप्रमाणे केली जाईल. नाफेडने रबी विपणन हंगामात २०१९-२० मध्ये समर्थन मुल्यवर राजस्थानवरून ८.५० लाख टन, हरियाणा २.५० लाख टन व मध्य प्रदेशवरून २.४४ लाख टन मोहरीची खरेदी केली आहे. याव्यतिरिक्त गुजरातवरून ७९ हजार टन मोहरीची खरेदी समर्थन मुल्यवर केली गेली आहे. नाफेडजवळ तेलवर्गीयांचा १५ लाख टन अतिरिक्त स्टॉक शिल्लक आहे. ज्यामध्ये ११ लाख टन मोहरी व ४ लाख टन अन्य तेलवर्गीय भुईमुग व सुर्यफूल आहे. नाफेडच्या या पाऊलामुळे उत्पादक बाजारपेठेत मोहरीच्या किंमतींमध्ये सुधारणा होण्याचा अंदाज आहे. कृषी मंत्रालयाच्या अनुमानानुसार पीक हंगाम २०१८-२०१९ मध्ये मोहरीचे उत्पादन ८७.८२ लाख होण्याचा अंदाज आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २५ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
21
0
संबंधित लेख