कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
कृषी क्षेत्राच्या स्टार्टअपसाठी ७०० कोटींचा निधी
नवी दिल्ली: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांनी कृषी नाबार्ड व ग्रामीण क्षेत्रातील स्टार्टअप कंपन्यासाठी ७०० कोटी रू. निधीची घोषणा केली आहे. एका अधिकृत वक्तव्यामध्ये म्हटले आहे की, नाबार्डची सहायक कंपनी नेबव्हेंचरर्सने कृषी, खादय आणि ग्रामीण स्टार्ट-अपसाठी ही घोषणा केली आहे. यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. त्याचबरोबर २०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधीचा ही हा पर्याय आहे.
नाबार्डचे आतापर्यंत इतर फंडमध्ये योगदान आहे. हे पहिल्यांदा घडते की, नाबार्डने आपला फंड जाहीर केला आहे. नाबार्डचे चेअरमन हर्ष कुमार भानवाला म्हणाले की, या खर्चापासून भारतामध्ये कृषी, खादय आणि ग्रामीण आजीविकासारख्या क्षेत्रात गुंतवणूक तंत्रला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. ते म्हटले की, नाबार्डने आतापर्यंत १६ पर्यायी गुंतवणूक निधीमध्ये २७३ कोटी रुपयांचे योगदान केले आहे. संदर्भ - इकोनॉमिक टाइम्स, १४ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
51
0
संबंधित लेख