कृषि वार्ताकृषी जागरण
आता, मशरूमचे नवीन वाण
उत्तर प्रदेशातील कानपुर येथील चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विदयापीठाच्या वैज्ञानिकांनी मशरूमचे नवे वाण तयार केले आहे. ही प्रजाती अधिक दिवसांपर्यंत टिकाऊ असते. त्याचबरोबर यावर रोगांच्या प्रादुर्भावची शक्यता ही नसते. जर आपल्या मुलांना कुपोषण व व्हायरल ताप असेल, तर यासाठी ही मशरूम योग्य आहे. या प्रजातीचा शोध घेण्यास चार वर्ष लागले आहे. ही प्रजाती पूर्णपणे जैविक व सुरक्षित आहे. वैज्ञानिकांनी मशरूमच्या या प्रगतशील प्रजातीमध्ये रोपांपासून मिळणाऱ्या दोन खास प्रकारच्या हार्मोनच्या सोबतच त्याचे पौष्टिक व औषधी गुणांना सहजरीत्या वाढविले आहे. या मशरूमला गहूच्या भुश्यापासून व ऊसाच्या पाचटवर विभिन्न प्रकारचे तापमान व आर्द्रता देऊन उगविण्यात आले आहे. या प्रजातीला तयार करण्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागला आहे.
वैज्ञानिकांनी रोपांपासून मिळणारे दोन हार्मोन इंडोल एसिटिक एसिड व जिबरिलनच्या मदतीने मशरूमच्या नवीन प्रजातीमध्ये व्हिटामिन, एंटी ऑक्सीडेंट, विभिन्न प्रकारचे एंजाइम व विभिन्न प्रकारचे रोग प्रतिरोधक क्षमता वाढविणारे घटक मिळण्यास यश मिळाले आहे. हे घटक रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी व व्हायरस संक्रमणला वाचविण्यासाठीदेखील यश मिळविले आहे. संदर्भ – कृषी जागरण, २६ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
44
1
संबंधित लेख