AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Jun 19, 06:00 PM
मान्सून समाचारअॅग्रोवन
मान्सूनने निम्मा महाराष्ट्र भिजला
पुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी मोठा पल्ला गाठत महाराष्ट्राचा जवळपास निम्मा भाग भिजला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, नगर, औरंगाबाद, नागपूरपर्यंत मजल आहे. आता, येत्या ४८ तासांमध्ये मान्सून उर्वरित महाराष्ट्रात पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
राज्यात दाखल होताच नैऋत्य मोसमी वाऱ्याने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. गुरूवारी कोकणात, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पोचणाऱ्या मान्सूनने सलग चौथ्या दिवशीदेखील प्रगती सुरूच ठेवली आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्रातील सोलापूरचा काही भाग व्यापून मराठवाडा व विदर्भाच्या दक्षिण भागात दाखल झाला. रविवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्र, विदर्भाचा आणखी काही भाग, मराठवाडयाचा बहुतांशी भाग व्यापला. मात्र मंगळवारपर्यंत मान्सून सर्व महाराष्ट्रात पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, २४ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
83
0