AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Mar 19, 01:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
पाहा, जगातील सर्वात महाग भाजी!
जगातील सर्वात महाग भाजीची किंमत ८२,००० आहे. या भाजीची इतकी किंमत असून ही या भाजीला जगातून अधिककाधिक मागणी आहे.
नवी दिल्ली- जगात सर्वात महाग कार,कपडे, घरे अशा विविध गोष्टी कानावर पडत असतात. मात्र जगातील सर्वात महाग भाजी ऐकली तर थोडे अजबच वाटेल. त्यात ती हजार रूपयांची असेल तर म्हणाल, यांना वेड लागलं आहे का? पण हे खरं आहे. जगातील सर्वात महाग भाजी 'हॉप शूट्स' ही असून या भाजीची किंमत १००० युरो म्हणजे ८२,००० रुपये प्रति किलो आहे. ब्रिटेन, जर्मनी तसेच अनेक युरोपीय देशांमध्ये या भाजीची शेती केली जाते. या भाजीची पाने शतावरीच्या झुडपासारखी दिसतात. वसंत ऋतुत या भाजीचे पीक घेतले जात असून या भाजीला जंगलामध्ये उगवतात. या भाजीची कापण्यावेळी खूप काळजी घेतात. कारण या भाजीला वेळेवर नाही कापल्यास याच्या फांद्या जाड होतात. त्यानंतर ही भाजी खाण्यायोग्य राहत नाही. या भाजीला फुले असतात. ज्यांची चव खूपच तिखट असल्यामुळे भाजीच्या फादयांनाच खाल्ले जाते. याव्यतिरिक्त या भाजीचे लोणचंदेखील बनवतात. या भाजीला वाढविण्यासाठी ऊन व आर्द्रता लागते. या भाजीचे वैशिष्टये म्हणजे एका दिवसात ६ इंचापर्यंत ही भाजी वाढते. संदर्भ – कृषी जागरण, १८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
122
0