मान्सून समाचारडॉ. रामचंद्र साबळे (जेष्ठ कृषी हवामान तज्ञ )
मान्सूनला म्हणावा तसा जोर नाही
मान्सून पावसाच्या वितरणात हवामान बदलाचा फरक प्रभावाने दिसून येत आहे. काही भागात अतिवृष्टी, तर काही भागात पावसाची कमतरता अशा प्रकारे मान्सूनचा पहिला दीड महिन्याचा कालावधी गेला. मान्सूनला अदयाप म्हणावा तसा जोर मिळत नाही. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात १४ जुलैला पावसाची शक्यता आहे. मात्र १५ ते १९ जुलै या दरम्यान हवेचे दाब वाढल्यामुळे पावसात उघदीप राहणे शक्य आहे. त्याचबरोबर पश्चिम घाट भागात पावसाचे प्रमाण अल्पसे राहील, तर राज्याच्या उर्वरित भागात पाऊस अत्यल्प राहील. कृषी सल्ला: १. ६५ मिमी जमिनीत ओलावा असेल, तर पेरण्या करा. २. एरंडीची पेरणी महत्वाची ३. तीळ लागवड फायदयाची ४. आंतर मशागतीची कामे करावीत. ५. भात रोपांची लागवड उरकून घ्यावी. ६.अडसाली ऊसाची लागवड करावी. संदर्भ: जेष्ठ कृषी हवामान तंज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
71
0
संबंधित लेख