AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Sep 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शासनाने कांदा निर्यातीवर लावले ८५० डॉलर प्रति टन न्यूनतम मुल्य
केंद्र सरकारने कांदयाच्या किंमती स्थिर राहण्यासाठी निर्यातीवर ८५० डॉलर प्रति टन न्यूनतम निर्यात मुल्य (एमईपी) लावले आहे. विदेश व्यापार महानिदेशालयव्दारा जारी केलेल्या अधिसुचनानुसार कांदयाच्या निर्यातीवर ८५० डॉलर प्रति टनचे एमईपी त्वरित लागू होणार असल्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने २ फ्रेबुवारी २०१८ ला कांदा निर्यातीवर एमईपीला शुन्य केले होते. यामुळे पहिल्या १९ जानेवारी २०१८ च्या या निर्यातीवर ७०० डॉलर प्रति टन एमईपी लावले होते.
कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकारीनुसार, चालू वित्त वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात कांदयाच्या निर्यात केवळ ३.५२ लाख टन ही झाले आहे. जे की मागील वर्षाच्या समान कालावधीत याची निर्यात ३.८८ लाख टन झाली होती. पीक हंगाम २०१८ -१९ मध्ये कांदयाचे उत्पादन जास्त झाल्याने किंमतीमध्ये वेगाने वाढ झाली असून, घरेलू बाजारपेठेत कांदयाच्या किंमतीत वाढ होऊन ४५ ते ५० रू. प्रति किलो पर्यंत झाले आहे, जे की उत्पादक बाजारपेठेत याचे भाव १४ ते ३० रू. प्रति किलो आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १३ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
66
0