सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्याच्या पद्धती
• खते जमिनीवर फेकू नयेत. योग्य ओलावा असतानाच द्यावीत. • पेरणी करताना खते बियाण्यांखाली पेरून द्यावीत. • आवरणयुक्त खते/ ब्रिकेटस / सुपर ग्रॅन्यूलसचा वापर करावा. युरिया, निंबोळी पेंडसोबत १:५ प्रमाणात वापर करावा. • खते पिकांच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेत विभागून द्यावीत.
• सूक्ष्म सिंचनाद्वारे द्रवरूप खतांचा वापर करावा. • तृणधान्य पिकांसाठी खतांचा ४:२:२:१ (नत्र : स्फुरद : पालाश : गंधक) या प्रमाणात, तर कडधान्यांसाठी १:२:१:१ प्रमाणात खताचा वापर करावा. • सेंद्रिय खतांचा नियमित वापराने जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान आणावा. • मृदा सुरक्षेकरिता मृदा संधारण, सेंद्रिय शेती, एकात्मिक रासायनिक व सेंद्रिय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य जोपासावे. ही काळाची गरज आहे. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनोमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
479
0