पशुपालनकृषी जागरण
जनावरांसाठी कॅल्शियम घरी बनविण्याची प्रक्रिया घ्या जाणून.
जनावरांसाठी घरी कॅल्शियम बनवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे. यासाठी प्रथम ५ किलो चुना आवश्यक असून, बाजारात त्याची किंमत साधारणत: ४०-५० रूपये असेल. हा चुना शुद्ध असणे आवश्यक आहे. चुना खरेदीच्या वेळी या बाबी लक्षात घ्याव्या. हा चुना एका मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये टाकावा. त्यामध्ये ७ लिटर पाणी टाकावे. हे मिश्रण चांगले ढवळून ३ तासांसाठी तसेच ठेवावे. या तीन तासात मिश्रण चांगल्या प्रकारे एकजीव होते परंतु त्यामध्ये पाणी राहत नाही. या क्रियेनंतर तयार मिश्रणात २० लिटर पाणी टाकून, चांगले ढवळून २४ तासांसाठी तसेच ठेवावे. २४ तासानंतर कॅल्शिअम तयार असेल परंतु हे असेच जनावरास देऊ नये.
खालीलप्रमाणे जनावरांना कॅल्शिअम द्यावे. एक ग्लास घ्या. हे मिश्रण न हलवता वरील पाणी अलगद एका भांड्यामध्ये काढून जमा करा. हि क्रिया करताना मिश्रण हलणार नाही याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे वरच्या थरातील स्वच्छ १५ लिटर पाणी बाजूला काढून घ्यावे व उर्वरित मिश्रण फेकून द्यावे. तयार झालेले कॅल्शिअमयुक्त द्रावण जनावरांना पाणी पाजण्याचा वेळी प्रति जनावर १०० मिली पाण्यात टाकून पाजावे. संदर्भ : कृषि जागरण जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
550
0
संबंधित लेख