AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Apr 19, 01:00 PM
कृषी वार्तापुढारी
अमेरिका, युरोपमध्ये आंबा निर्यात सुरू
देशात चालू वर्षी आंबा निर्यात ५० हजारपेक्षा अधिक टन व्हावे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी सांगितले. पवार म्हणाले, अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे १५ टन आंबा ९ एप्रिलला निर्यात झालेला आहे. याशिवाय आस्ट्रेलिया २.५ टन, रशिया २ टन, न्युझीलंडमध्ये ५ टन हापूस आंबा निर्यात झालेला आहे. आखाती देशात ही आंबा निर्यात होत आहे. लवकरच जपान व दक्षिण कोरियाला आंबा निर्यात होणार आहे. निर्यातदारांनी कर्नाटकातील बैंगनपल्ली व गुजरातमधील केशर आंबाही विविध देशांमध्ये निर्यात होत आहे.
आंबा निर्यातीसाठी ज्या शेतकऱ्यांनी अपेडाच्या मॅंगोनेट या ऑनलाइन प्रणालीवर बागांची प्रथम नोंदणी केलेली आहे, त्याच आंबा उत्पादकांना आंबा निर्यातीसाठी वापरण्याचे बंधन असून, कृषी विभागाकडून त्यास कोड नंबर दिला जातो तसेच निर्यातीपूर्वी आंब्यांची तपासणी ही केली जाते. सध्या मुंबईतून अमेरिका, आस्ट्रेलिया, रशिया, न्यूझीलंड व आखाती देशात ही आंबा निर्यात सुरू झाल्याचे माहिती ही त्यांनी यावेळी दिली. संदर्भ – पुढारी, १४ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
10
0