आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील मर रोगाचे व्यवस्थापन
पावसाच्या जास्त दिवस पडलेल्या खंडामुळे आणि अचानक होणार्‍या अतिप्रचंड पावसामुळे कपाशीची मुळी अकार्यक्षम होऊन, त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होतो. ही समस्या कमी करण्यासाठी रासायनिक फवारणी बरोबरच शेतात जमा झालेले पाणी चर तयार करून शेतीबाहेर काढावे व झाडाच्या मुळाजवळील माती हलवून घ्यावी. जेणेकरून तिथली हवा खेळती राहील असे केल्यामुळे मुळ्यांची सड न होता, दिलेल्या खतामधून पोषक तत्व घेण्याची क्षमता वाढविण्यात मदत होते.
फेसबुक, व्हॉट्सअँप किंवा मॅसेज यापैकी कुठलाही पर्याय वापरुन, त्वरित इतर कापूस पीक घेणाऱ्या शेतक-यांसह शेयर करा
228
0
संबंधित लेख