AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Jun 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भुईमूगमधील हुमणी किडीचे व्यवस्थापन
हुमणी ही मातीमधील महत्वाची कीड असून, यामुळे भुईमूग पिकाचे भारी नुकसान होते. या पिकाच्या सुरूवातीच्या काळात लार्वाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात असतो. मात्र नंतरच्या काळात या किडीच्या प्रादुर्भावामुळे जास्त नुकसान होते. जसे की, प्रादुर्भाव झालेले रोपे वाळतात व सहज उपटली जातात याचा परिणाम संपूर्ण शेतीवर होऊन पिकांचे बरेच नुकसान होऊ शकते. हुमनीच्या नियंत्रणासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापन करा.
व्यवस्थापन- • शेतीभोवती असलेल्या झाडांची वेळोवेळी छाटणी करावी. • पहिल्या मोठ्या पावसानंतर हुमणीचे प्रौढ बीटल झाडाची पाने खातात बबुल, बोर, शेवगा, नीम झाडाच्या फांद्या हलवून त्यावरील हुमणीचे किडे गोळा करून नष्ट करावीत. • क्विनोलफॉस २५%ईसी@२० मिली प्रति १० लिटर पाण्यात शेतीभोवती असणाऱ्या झाडावर फवारणी करावी. • ऊन्हाळ्यात नांगरटीमुळे हुमणीची संख्या कमी होण्यास मदत होते. • प्रकाश सापळे स्थापित करून त्याकडे बीटल आकर्षित होतात. गोळा करून त्यांना नष्ट करावे. • बीजप्रक्रिया क्लोरोपायरीफॉस २० ईसी@२५ मिली किंवा थायमेथोक्झाम ३० एफ एस १० ग्रॅम प्रति किलो बियाणांसाठी पेरणी पूर्वी करावी. बीजप्रक्रिया केल्यावर ३ तास बियाणे सावलीत ठेवावे. • उभ्या असलेल्या पिकामध्ये क्लोरोपायरीफॉस २० ईसी@४ लिटर प्रति हेक्टरी ठिबकमधून द्यावे किंवा फोरेट १० जी @१० किलो प्रति हेक्टरी मातीमधून द्यावे. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
647
101