AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jan 20, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकांमधील घाटे अळीचे नियंत्रण
रब्बी हंगामात हरभरा पिकाची लागवड संपूर्ण सिंचन व बिगर सिंचनाखाली केली जाते. पेरणीपासून ते काढणीपर्यंत "घाटे अळी" ही पिकाचे नुकसान करू शकते. प्रथम नवीन कोवळी पाने किंवा घाट्यांचा वरचा थर खाते त्यामुळे पिकाचे नुकसान होते. घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये अळी घाट्यांना छिद्र करून आतील दाणे खाते. कधी कधी अळी पूर्णपणे घाट्यांमध्ये प्रवेश करते आणि पक्व घाटे खाते. नियंत्रण:- १. प्रति हेक्टर ४० फेरोमोन सापळे बसवावे. २. लाईटची सुविधा असल्यास, एक प्रकाश सापळा बसवावा. ३. भक्षक पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी टी-आकाराचे सापळे बसवावे. ४. पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बेव्हेरिया बेसियाना हे बुरशी आधारित कीटकनाशक @४० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिंजेनेसिस हि जिवाणूजन्य आधारित पावडर @१५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ५. भाजीसाठी या पिकाची लागवड केली असल्यास कोणत्याही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करु नये. त्याऐवजी, निम आधारित कीटकनाशक (१% ईसी) @२० मिली किंवा (०.१५% ईसी) @४० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. ६. अधिक प्रादुर्भाव असल्यास फेनवलेरेट २० ईसी @१० मिली किंवा लॅम्बडा सायहेलोथ्रिन ५ ईसी @५ मि.ली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी @२० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेलिनिप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी @५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ७. मोठ्या अळ्या कोणत्याही कीटकनाशकाद्वारे नियंत्रित होऊ शकत नाहीत. त्यामुळे अळ्या गोळा करून नष्ट कराव्या. संदर्भ:- संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
365
3