AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Nov 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
संत्रा पिकातील तपकिरी फळ कूज व्यवस्थापन:
जास्त आर्द्रता, कमी तापमान व अपुरा सूर्यप्रकाश अश्या वातावरणामुळे संत्रा झाडाच्या जमिनीलगतच्या फांद्यावरील पानांवर व फळांवर तपकिरी व काळ्या रंगाच्या बुरशीची लागण होते. कालांतराने फळे सडून त्यांची गळ होते. यासाठी उपाय म्हणून सर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची योग्य विल्हेवाट लावून बाग स्वच्छ करावी. त्याचबरोबर कॉपर ऑक्सि क्लोराईड @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी. व जमिनीतून ट्रायकोडर्मा हार्जियानम १०० ग्रॅम व सुडोमोनास फ्लुरोसन्स १०० ग्रॅम १ किलो शेणखतात मिश्र करून प्रति झाडास द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
78
5