AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Oct 19, 10:00 AM
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा रोपवाटिका व्यवस्थापन
• एक एकर कांदा लागवडीसाठी ४ ते ५ गुंठे जमीन रोपवाटिका करण्यासाठी लागते. • लव्हाळा, हरळी असणारी व पाणी साचणारी सखल जमीन रोपवाटिकेसाठी निवडू नये. • रोपवाटिका नेहमी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी करावी. तणाची वाढ होण्याची किंवा शेणखतांमधून तण येण्याची शक्‍यता असल्यास, बियाणे पेरण्यापूर्वी वाफे भिजवून घ्यावेत. तणाचे बी उगवून आल्यानंतर खुरपणी करून बियाणे पेरावे. • रोपे गादी वाफ्यावर तयार करावीत. गादी वाफ्यावर रोपांची वाढ एकसारखी होते. मुळांच्या भोवती पाणी फार काळ साचून राहत नाही. त्यामुळे रोपे कुजत नाहीत. लागवडीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात. • गादी वाफे एक मीटर रुंद, तीन ते चार मीटर लांब करावेत. वाफ्याची उंची १५ सेंमी ठेवावी. • वाफे तयार करताना प्रत्येक वाफ्यात दोन घमेली चांगले कुजलेले शेणखत आणि ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेणखताबरोबरीने मिसळावे.
• बियांची उगवण क्षमता चांगली असेल, तर एक एकर लागवडीसाठी अडीच ते तीन किलो बियाणे पुरेसे होते. • पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास २.५ ते ३ ग्रॅम थायरम किंवा कॅप्टन किंवा कार्बेन्डाझिमची प्रक्रिया करावी. • बी पेरल्यानंतर पाटाने पाणी देताना त्याचा प्रवाह कमी ठेवावा. बी पेरल्यानंतर दुसरे पाणी ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्यावे. • तण असल्यास खुरपणी करावी. रोपांच्या ओळीमधील माती हलवून घ्यावी म्हणजे रोपांच्या मुळांभोवती हवा खेळती राहील. पुर्नलागवडीच्या अगोदर पाणी कमी करावे. त्यामुळे रोपे काटक बनतात. मात्र रोपे उपटण्यापूर्वी २४ तास अगोदर पाणी द्यावे त्यामुळे रोप काढणे सोपे होते. • खरीप हंगामात ४० ते ५० दिवसात रोप तयार होते. • रोप तयार होत असताना त्यावर फुलकिडे आणि शेंडा जळणे या रोगांचा प्रादुर्भाव होतो. यांच्या नियंत्रणासाठी क्विनोलफॉस २५ इसी १५ मि.लि. आणि २५ ग्रॅम मॅंकोझेब प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. संदर्भ –अग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
406
10