AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Feb 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आंब्यामधील तुडतुडे व्यवस्थापन
आंब्याचे झाड फुलधारणेच्या अवस्थेत असताना पिल्ले आणि प्रौढ यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. पिल्ले आणि प्रौढ हे फुलांमधील व कोवळ्या पानातील रस शोषून घेतल्यामुळे फुले कोरडी पडतात तसेच गोटी आकाराची आंब्याची फळे गळून जातात. त्याचबरोबर पानांवर काजळीसारखा थर आल्यामुळे प्रकाशसंश्लेषणला अडथळा निर्माण होतो. आर्द्रता युक्त हवामान या किडींच्या वाढीसाठी योग्य असते. सरदार, हापूस, लंगडा हे वाण ह्या किडींसाठी सहनशील आहेत. व्यवस्थापन – • झाडांची वेळोवेळी छाटणी करावी. • बागेमध्ये पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल याची व्यवस्था करावी. • पाट पाणी देण्याऐवजी ठिबक सिंचन मधून पाणी द्यावे. • क्विनॉलफॉस २५ इसी २० मिली @ १० लि पाण्यात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत झाडाच्या खोड्यावर व फांद्यावर फवारणी करावी.
• बुरशी आधारित कीटकनाशक बेव्हेरीया बासियाना किंवा व्हर्टिसिलियम लेकानी, ४० ग्रॅम प्रति १० लि पाण्यात फवारणी करावी. • निम आधारित कीटकनाशक @ १० मिली (१% इसी) ते ४० मिली (०.१५ इसी ) प्रति १० लि पाण्यात फवारणी करावी. • डेल्टामेथ्रीन २.८ ईसी @ ५ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी @ १० मिली किंवा थायोमेथोक्झाम २५ WG @४ ग्रॅम किंवा इमाडाक्लोप्रिड १७.८ एसएल १० लि पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत)
98
34