AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Jul 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकातील पाने खाणाऱ्या अळीचे नियंत्रण
सोयाबीन हा एक महत्त्वाचा खाद्य स्त्रोत आहे आणि ह्याला तेलवर्गीय पिक म्हणून ओळखले जाते.सोयाबीन पिकामध्ये ३८-४०% प्रथिने, २२% तेलाचे प्रमाण, २१% कर्बोदके, १२% आद्रतेचे इतके प्रमाण असते. सोयाबीन उत्पादनात मध्यप्रदेश हे राज्य देशात आघाडीवर आहे. सोयाबीन संशोधन केंद्र इंदौर येथे कार्यरत आहे. व्यवस्थापन - • सोयाबीन पिकाच्या चारी बाजूने एरंडीची झाडे लावावीत. कारण प्रौढ पतंग एरंडीच्या पानांवर अंडी घालण्यास पसंद करतात, यामुळे प्रादुर्भाव झालेले पाने लगेच ओळखू येतात. ही अंडी घातलेली पाने एकत्र गोळा करून नष्ट करणे ही सोपे जाते. • पानांवर संध्याकाळच्या वेळी NPV @२५० मिली प्रति ५०० लिटर पाण्यामध्ये एकत्र करून फवारणी करावी. • जिवाणूजन्य पावडर, बेसिलस थुरिंजेंसिस @१५ ग्रॅम किंवा बव्हेरिया बॅसियाना, बुरशीजन्य बुरशीनाशक पावडर @४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. • निंबोळी बियांपासून बनविलेला अर्क ५% @१० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. • पिकावर अतिजास्त प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आल्यास, नियंत्रणासाठी क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५ एससी @३ मिली किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी @१० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी @२० मिली किंवा इंडोक्साकार्ब १५.८ ईसी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
260
20